dostitour@gmail.com ९५९४८८०१२३ ९५९४४३२७४८ ९७०२२५१५८४ ८८२८२२४१२१. www.dostitour.com
आमच्या विषयी :

नमामी देवी नर्मद नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर...

शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परिक्रमेचे मर्म आणि माहात्म्य माहित असलेला समाज परिक्रमा करण्यास उत्सुक असतो परंतु सर्व साधकांना पायी परिक्रमा शक्य नसते. परिस्थिती नसते किंवा वेळ नसतो. शारिरीक दृष्टया शक्य नसते अशा साधकांना नर्मदा परिक्रमा घडवुन आणणे, सोयी करणे व जास्तीत जास्त शास्त्रोक्त पध्दतीने नर्मदा परिक्रमा घडवुन आणणे हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे. खर तर पायी परिक्रमा करण्यासाठी ३ वर्षे किंवा अधिक कालावधी लागतो म्हणुन तशीच परिक्रमा करवून घेणे, नर्मदा संकल्प, पुर्ती, अष्टक, आरती, कढई प्रसाद, नर्मदेला साडी चोळी किंवा पुजन करणे या सर्व गोष्टी करत आपण बसने ही परिकमा करत असतो. कुणाला शारिरीक व्याधीमुळे जमीनीवर झोपता येत नाही, बसता येत नाही, थंड पाण्याने स्नान करू शकत नाही प्रवासाचा त्रास होतो अशा सर्वासाठी सर्व सोयीयुक्त पण तेवढ्याच धार्मिकनेने. भावनेने व श्रध्देने व घरगुती भोजन आस्वादासह ही यात्रा आमची दोस्ती टूर आयोजित करते. गेली १२ वर्षे ही परिक्रमा आम्ही करत असुन आता पर्यंत हजारो लोकांनी याचा आनंद घेतला आहे.

“आध्यात्मिक आनंद व पर्यटन याचा संगम म्हणजेच दोस्तीची शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा.”

"प्रवास फक्त जग दाखवत नाही तर जीवन आणि जगणे याची कला शिकवतो"

दोस्ती टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स फक्त पर्यटन घडवुन आणणारी संस्था नसुन, आपुलकीने काळजी घेणारे एक कुटुंब आहे. आम्ही किफायतशीर दरात सहल व यात्रांचे आयोजन करतो. सहल मार्गदर्शन, उत्तम हॉटेल व्यवस्था, सुसज्ज वाहन व्यवस्था, अनुभवी टूर मॅनेजर ही आमची वैशिष्टये आहेत.

आम्ही प्रामुख्याने भारतभर तसेच विदेशात नेपाळ. भुतान, श्रीलंका, दुबई, दक्षिण आशिया अशा सर्व सहली व धार्मिक यात्रांचे आयोजन करतो. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट सहल सभासदाचे समाधान, आनंद हे आहे. आपल्या धावपळीच्या जीवनात पर्यटन म्हणजे एक नवसंजीवनी, ऊर्जा देणारे अतिउत्तम साधन आहे. संस्कृती पाहण्याचा, माणसे जोडण्याचा, जीवनशैली अनुभवण्याचा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवुन कंपनी कार्यरत आहे.

यामध्ये प्रामुख्याने नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा, कुरवपुर पिठापुर यात्रा, दत्तधाम यात्रा, त्रिस्थळी यात्रा या धार्मिक तर केरळ ते काश्मीर व गुजरात ते ओरिसा अशा भारतभर सहलींचे आयोजन करताना अंदमान व आसाम पुर्वाचल भागास प्राधान्याने सहली आयोजन करण्यास आग्रही असतो. नाते मैत्रीचे याच ध्येयानुसार ही पर्यटन संस्था कार्यरत असुन पर्यटकांनी सेवा करण्याची संधी दयावी व आनंद घ्यावा आमच्या दर्जेदार सहली व यात्रांचा.

आपले स्नेहांकीत,
प्रवीण बांगर, शेखर पारटे