नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी, चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. नर्मदा परिक्रमा कुणी, का, कोणत्या वयात, कशी आणि कशासाठी करावी ? नर्मदा परिक्रमा कुणीही करावी. इथे जन्मजात, वंश, जाती, धर्म, लिंगभेद, वय यांची अजिबात आडकाठी नाही. नर्मदा परिक्रमा का करावी याचे उत्तर असे की, नर्मदा परिक्रमा हे मानवी मनाच्या उन्नयनाचे / सबलीकरणाचे - निर्मलीकरण साधण हे आपल्याशिवाय दुसऱ्याच्या हातात नाही. दुसऱ्याचा अनुभव वाचून ऐकुन ते उमगल, कळल तरी त्याची अनुभूती स्वतःची स्वतः च घेण केव्हाही श्रेयस्कर
परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथुन केली जाते, परंतु तेथुनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला अमरकंटक नेमावर व ओंकारेश्वर यापैकी कुठुनही सुरूवात करता येते. परिक्रमा चालु असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही म्हणजेच नर्मदेतुन वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिध्द आहे. मात्र नर्मदेला मिळणारे पाणी ओलांडलेले चालते. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे किंवा ५ घरी भिक्षा मागुन जेवणे वाटेत मिळेल ते पाणी पिणे जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने परिक्रमा करावी लागते. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पुजा स्नान संध्यावंदन व नित्य पाठ करून परिक्रमा दरम्यान सतत || ॐ नर्मदे हर|| या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते.
नर्मदा परिक्रमेदरम्यान पाळावयाचे परंपरागत नियम आहेत त्यापैकी स्वतःला पाळणे शक्य आहे असे वेचक नियम परिक्रमा करणाऱ्यांनी स्वताच ठरपुन घ्यावेत किमान काही नियम तरी आवर्जुन पाळायचे ठरवावे नि ते निष्ठापुर्वक पाळावेत. मग परिकमा कितीही कालावधीची व पध्दतीची, कुठल्याही मार्गानं पायी किंवा वाहनातुन कशीही असु, परिकमेची वाटचाल नर्मदामाईप्रती अतीव आदरान निश्रद्धेने करणं एवढच महत्वाचं अन् पुरेसं आहे
नर्मदा परिक्रमा कोणत्या वयात करावी? कुणी म्हणतील, नर्मदा परिक्रमा ही जेव्हा रिकामपण येतं तेष्हा म्हणजे उत्तर आयुष्यात करण्याची वानप्रस्थाश्रमाची वाटचाल आहे. खरं तर मानवी मनाचं उन्नयन निर्मलीकरण सबलीकरणाचं साधण्याचा मानवी जीवनातील आदर्श कालखंड म्हणजे बम्हाचर्याश्रम नि गृहस्थाश्रम हया दरम्यानचाच आहे. कारण हया कालावधीत जर प्रत्येकाने आपापल्या मनाचं उन्यन/सब्बलीकरण निर्मलीकरण साधले तर ते त्या व्यक्तीच्या पर्यायानं समाजाच्या स्वास्थाला उपकारकच असणार आहे. अर्थात चांगल कृत्य करायला कधीच उशीर झालेला नसतो. त्यामुळे नर्म द परिक्रमा आयुष्यात केव्हाही करायला हरकत नाही.
नर्मदा परिक्रमा कशी करावी ज्यांना शारीरिकदृष्टया किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा शक्य नाही अशांनी अगदी तीन आठवड्याच्या कालावधीत वाहनाण्दारे नर्मदा परिक्रमा केली तरीसुध्दा चालेल. परिक्रमा कशीही करावी पण ती जाणीव पुर्वक डोळसपणे निश्रद्धेने करणं अगत्याचं आहे.
परिक्रमा म्हणजेच आपल्या मराठीत प्रदक्षिणा. आपण मंदिरात जातो देवतेला प्रदक्षिणा घालतो. तेव्हा आपल्या मनात त्या देवतेबद्दल जे काही भाव असतात जी काही श्रद्धा असते जे प्रेम असते त्यामुळे त्या देवतेशी आपली नाळ जुळली गेलेली असते. यामुळे आपण निसर्ग पर्यटनाला आलेलो नसुन त्या देवतेची कृपा प्राप्त करण्यासाठी त्या अनुषंगाने आपली अध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आलेलो आहोत याचे भान राहिल. आणि माणुस बंधनात असला की भरकटत नाही. चला तर मग नियम काय आहेत ते पाहु.
परिक्रमेतील पारंपरिक नियम परिक्रमेच्या प्रवासात काही पारंपरिक नियम आहेत. त्यापैकी स्वतःला पाळणे शक्य आहे असे वाटणारे नियम परिक्रमा करणाऱ्यांनी स्वतःच्या शारीरिक क्षमतेनुसार घ्यावेत. किमान काही नियम तरी आवर्जून पाळायचे असतात.
1. पांघरायला एक रग
2. खाली अंथरायला एक पोत, चटई अथवा कम्बळ
3. पाण्यासाठी कडी असलेला डबा
4. थंडीसाठी स्वेटर अथवा जॅकेट
5. हातात काठी असल्यास सुविधा होते.
1. परिकमेचे प्रमाणपत्र घेणे
2. पांढरा ड्रेस परिधान करणे.
3. पुरुषाने परिक्रमा संकल्प सोडायच्या आधी मुंडन करणे.
4. परिकमा सुरू करण्याआधी कन्या पुजन आणि कन्या भोजन करणे.
5. संकल्प सोडणे.
6. मैय्या, दंड, कमंडलु हयांची पुजा करून परिकमेला सुरुवात करणे.
7. परिक्रमा करत असताना काय नियम आहेत ते पाहू.
8. गादीवर झोपायचे अथवा बसायचे नाही.
9. कोणाला काही मागायचे नाही.
10. कोणी काही दिले तर नाही म्हणायचे नाही.
11. सतत नर्मदे हर चा मंत्र चालु पाहिजे.
12. मैय्या मध्ये अगदी मध्यभागी जाऊन स्नान करायचे नाही. स्नान करताना नाभी पर्यंतच्या पाण्यात उभे राहुन केलेला जप लवकर सिध्द होतो आणि शरीरातील चक्र लवकर एक्टिवेट होतात.
13. मैय्या पार करायची नाही म्हणजेच ओलांडायची नाही. म्हणजेच चुकुन हया किनाऱ्याहुन त्या किनाऱ्याला जायचे नाही हा धोका अमरकंटकच्या जंगलात खुप आहे. कारण मैय्या पात्र एकदम लहान आहे.
14. जिथे मैय्या असेल तिथे मैय्या स्नानच करायचे.
15. मैय्या जल च सेवन करायचे. बिसलेरी पाणी प्यायचे नाही.
16. आहार शुध्दी विचार शुध्दी शरीर शुध्दी चे काटेकोर पालन करायचे.
17. सकाळी निघताना आणि संध्याकाळी मुक्कामाला पोहोचल्यावर स्नान करून मैय्या पुजन आरती करायची.
18. आश्रमात आसन लावायच्या आधी झाडुन घ्यायचे. आणि आसन उचलल्यावर झाडुन काढुन मगच आश्रम सोडायचा.
19. आसन एकदा लावले की निघतानाच उचलायचे.
20. परिक्रमा पुर्ण झाल्यावर संकल्प पुर्ती करून मैय्या पुजन कुमारीका पुजन भोजन करून ओंकारेश्वरला ओंकार मांधाताची परिक्रमा करून ओंकारेश्वराला आणि ममलेश्वराला जल अर्पण करून परिक्रमेची सांगता होते.
21.मैय्यामध्ये स्नान करताना अंगाला साबण लावायचे नाही. मैय्यामधे कपडे पण धुवायचे नाहीत.
22. भोजन करायच्या आधी त्यातले ५ घास काढुन ठेवायचे. (एक मैय्या, दुसरा गाय, तिसरा कुत्रा, चौथा जलचर, पाचवा पक्षी.)
23. आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा माशाला चुरमुरे किंवा कणकेचे छोटे छोटे गोळे घालावेत.
24. सूर्योदय झाल्यावर चालायला सुरुवात करणे आणि सुर्यास्तापुर्वी मुक्कामाला थांबणे हा महत्वाचा नियम काटेकोरपणे पालन करावा. (किनाऱ्याला लोकांनी पाईप लावलेले असतात. पाण्याच्या मोटार चालु असतात. काटे आणि इतरही भुचर प्राण्यांचा वावर असतो त्यामुळे अंधारात चालणे धोकादायक असते. आणि अंधार पडायच्या आत मुक्कामाच्या ठिकाणी पाहोचायला हवे अश्या हिशोबाने पुढच्या गावाची माहीती घेऊन चालण्याचा स्पिड ठेवावा. म्हणजे अंघोळ मैय्या पुजन वेळेतच होते.)
25. सकाळी निघताना स्नान, मैय्या पुजन करून मगच आसन हलवायचे तसेच पारोसे मैय्याला घेऊन पुढे निघायचे नाही.
26. मैय्या आरती लिंगाष्टक रुद्राष्टक बिल्वाष्टक व्दादशजोतिर्लिंग स्तोत्र सौराष्ट्र सोमनाथंच हे सगळ मुखोग्दत करून ठेवावे.
27. छान छान भजनं पाठ करून ठेवावीत मैय्याची आरती झाल्यावर म्हणता येतात. मैय्याला भजन सेवा खुप प्रिय आहे.
28. कॅरिमॅट काळया कलरचे घ्यावे. त्याला वरती प्लॉस्टिकचा पेपर गुंडाळुन घ्यावा. म्हणजे चालताना काटे अडकुन फाटणे किंवा खाली अंथरल्यावर खराब होत नाही.
29. एक जुन्या बेडसिटचा तुकडा आसनाच्या साईजचा किंवा इतर कशाचाही तुकडा सॅकच्या वरच्या बाजुला ठेवा. म्हणजे चालता चालता रस्त्याच्या कडेला किंवा झाडाखाली बसताना टाकुन बसता येते. कपडे खराब होत नाहीत आणि झोपताना जेव्हा पायाला तेल लावतो तेव्हा पायाखाली टाकता येते. म्हणजे आपले कॅरिमॅट तेलकट होत नाही. जिथे असु तिथे दर अमावस्येला आणि पौर्णिमेला कुमारीका पुजन करावे. जेव्हा जमेल तेव्हा मैय्या आणि शंकराला दुधाचा अभिषेक करावा.
30. हे सगळे नियम आपापल्या श्रध्देनुसार व शरिर प्रकृतीनुसार आचरणात आणावेत व तसे शक्य नसल्यास ही यात्रा बसने किंवा छोटया गाडीने सुध्दा शास्त्रोक्त पध्दतीने जमेल तसे नियम पाळत श्रध्देने व मनोभावे करता येते.
॥ शुभं भवतु ॥